अवघड गोष्टी शिकवण्यासाठी ‘सेल्फी विथ सक्सेसचा’ फंडा

मुलांना चॅलेंजेस आवडतात. आव्हानं स्वीकारायला ती कायम तत्पर असतात. या चॅलेंजेसचा उपयोग मुलांना अवघड वाटणाऱ्या गोष्टी शिकवताना मी नेहमीच करुन घेतो. इयत्ता पाचवीच्या वर्गावर गणित शिकवताना मुलांचं संख्यावाचन घेत होतो. संख्या वाचनात मुलांना अडचणी येत असल्याचं लक्षात आलं. संख्या वाचनात अडखळणारी मुलं सहज अब्जापर्यंतचं संख्या वाचन करु शकतील, अशा पध्दतीने त्यांना शिकवण्याचं पहिलं चॅलेंज मी स्वत: स्वीकारलं. मुलांचे गट करून आपली बोटं फार करामती असतात.त्यांच्या मदतीने आपण शिकू शकतो, असा विश्वास मुलांना दिला. अन् आपल्या हातांच्या मुठी आपल्या बाजूने करून उजव्या हाताच्या अंगठ्यापासून एकक ते डाव्या हाताच्या अंगठ्यापर्यंत अब्जची संकल्पना तोंडपाठ घेतली. फळ्यावर एकक ते अब्ज खाते पाडून लिहून घेऊन सराव घेतला.

एक अंकी संख्येपासून सुरू झालेला प्रवास अब्जापर्यंत सहजच सरावाने मुलांचा पाठ झाला. अंक लिहल्यावर उजवीकडून पहिली तीन घरं नंतर दोन दोनची घरं खुणा करायचेही मुलं शिकलीत. मग काय एकदा दोनदा पुन्हा पुन्हा सराव झाल्याने मुलांनी दणक्यात अब्जापर्यंत संख्याज्ञान आत्मसात केले.

    मुलांना आव्हान दिलं की ते वैयक्तिक अन सामुहिक पातळीवर ते पेलतात. त्यांना शिकण्यास प्रवृत्त केलं, थोडी कौतुकाची थाप पाठीवर दिली तर मुलं नैसर्गिकरित्या शिकण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग देतात. शिकवताना मुलांना बाह्यप्रेरणा देणं महत्त्वाचे आहेच पण त्यासोबतच त्यांच्यातली अंतप्रेरणा जागृत करणं फार महत्त्वाचे आहे.मुलांना निकोप स्पर्धा करायला नेहमी आवडते. त्यांना दिलेलं आव्हान त्यांनी पार पाडले. शिकवण्यात,शिकण्यात नाविन्यता असली तर करत असलेला बदल हा दोन्हीही बाजूने स्वीकारला जातो.

हेही वाचा!

अंक कार्ड,संख्या कार्ड,हाताची बोटं,वही,पाटी,फळा,पुस्तक,मोबाईल,टी.व्ही हवं ते साहित्य यावेळी वापरलं गेलं.दहा अंकी संख्या वाचन आव्हान दिल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी येणारे अडथळे या निमित्ताने कळाले. समुहात अन् वैयक्तिक करत असलेला अभ्यास यावेळी अधोरेखित झाला. मागणी तसा पुरवठा केला गेला.सर्वांत आधी अचूक संख्या वाचन केलेल्या विद्यार्थ्यांसोबत मस्त सेल्फी घेतला अन् कौतुक म्हणून पेन्सिल बक्षीस दिली. मुलांना खूप आनंद झाला.त्यांना नवीन काहीतरी गवसल्याचं जाणवत होतं. आव्हानपूरक वातावरण तयार झाल्याने सर्वांनी प्रयत्न केले.

प्रत्येक मूल हे वेगळं असतं. ते त्याच्या क्षमतेनुसारच शिकतं हे या निमित्ताने समजलं. आव्हान दिल्यामुळेच मेंदूची विविध कार्यक्षेत्रे सतर्क राहिली अन् मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने पाऊल टाकता आले.

 बक्षीस मिळालेला पाचवीच्या वर्गातला 'वीर माळी' या मुलानं जेव्हा थकल्या भागलेल्या बापाला संध्याकाळी कौतुकानं 'सेल्फी विथ सक्सेस' ची गोष्ट सांगितली, मिळालेलं बक्षीस दाखवलं ,तेव्हा बापानं केलेलं कौतुक वीरच्या तोंडून ऐकतांना मी स्वत:च भारावून गेलो.

'वा रे..! चांगला हुशार झाया ना मंग.'

वडिलांनी केलेले कौतुक त्याने वर्गात सगळ्यांना सांगितलं. ते सांगताना त्याच्या शब्दात दम होता. आत्मविश्वास होता. काहीतरी नवे करण्यासाठी त्याचे डोळे आसुसले होते.

मुलांची क्षमता पाहून जर त्यांना एखादे काम करण्यास दिले तर ते आनंदाने काम कारतात .यातून मिळणारा परिणामही सकारात्मक असतो. याचवेळेस जर त्यांचं कौतुक म्हणून त्यांच्यासोबत सेल्फी काढला तर त्यांना गोष्टी अवघड असल्या तरी त्या हव्याहव्याशा वाटतात.

- भरत पाटील

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरधे

ता.मालेगाव जि.नाशिक

खूप शाळा आणि शिक्षक मुलांसाठी फार इंटरेस्टिंग काही ना काही करत असतात. अभ्यास असो किंवा अभ्यासाच्या बाहेरची मज्जा ; अशा उपक्रमांना ऊर्जामध्ये खास जागा ठेवली आहे. सगळ्याचा शाळांना "आयडिया शेअरिंग" साठी याचा उपयोग होईल. तर, उपक्रमाविषयीची माहिती फोटोसह जरूर पाठवा.

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact